बागीलगेतील मंडळ हरिपाठ स्पर्धेत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागीलगेतील मंडळ
हरिपाठ स्पर्धेत प्रथम
बागीलगेतील मंडळ हरिपाठ स्पर्धेत प्रथम

बागीलगेतील मंडळ हरिपाठ स्पर्धेत प्रथम

sakal_logo
By

59218
कोवाड ः तावरेवाडी येथील महिला हरिपाठ स्पर्धेतील बागीलगेचा विजयी रवळनाथ बाल हरिपाठ मंडळ संघ.


बागीलगेतील मंडळ
हरिपाठ स्पर्धेत प्रथम
कोवाड, ता. ३० ः तावरेवाडी (ता. चंदगड) येथे श्री मंगाईदेवी महिला हरिपाठ मंडळ, मंगाईदेवी मंदिर समिती व कै. संभाजी कागणकर सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित केलेल्या महिला हरिपाठ स्पर्धेत बागीलगे येथील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत दुंडगे येथील ज्ञानेश्‍वर सांप्रदायिक महिला बाल हरिपाठ मंडळाने द्वितीय व निट्टूर येथील भावेश्वरी महिला मंडळाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय भावेश्वरी हरिपाठ मंडळ (बसर्गे), ज्ञानोबा तुकाराम हरिपाठ मंडळ (कोवाड), बाल हरिपाठ मंडळ गोल्याळी (कर्नाटक), ज्योतिर्लिंग हरिपाठ मंडळ (निट्टूर) यांनी अनुक्रमे यश संपादन केले. उत्कृष्ट पकवाज वादक (माऊली हरिपाठ मंडळ, कोवाड), उत्कृष्ट गायक (बाल हरिपाठ मंडळ बागीलगे) व शिस्तबद्ध संघ म्हणून धुमडेवाडीच्या ज्योतिर्लिंग हरिपाठ मंडळाचा गौरव करण्यात आला. कीर्तनकार संजय पाटील, सखाराम पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या संघांना सरपंच माधुरी कागणकर, नारायण गडकरी, निवृत्ती हारकारे, अमित वरपे, संदीप पाटील, विलास कागणकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.