गोडसाखर बंद पाडणाऱ्यांना धडा शिकवा : अमर चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर बंद पाडणाऱ्यांना धडा शिकवा : अमर चव्हाण
गोडसाखर बंद पाडणाऱ्यांना धडा शिकवा : अमर चव्हाण

गोडसाखर बंद पाडणाऱ्यांना धडा शिकवा : अमर चव्हाण

sakal_logo
By

59287
हलकर्णी : नूल-नरेवाडी गटात काळभैरव शेतकरी-कामगार विकास आघाडीने प्रचार फेरीतून सभासदांशी संपर्क साधला.

गोडसाखर बंद पाडणाऱ्यांना
धडा शिकवा : अमर चव्हाण
हलकर्णीत काळभैरव आघाडीचा प्रचार
गडहिंग्लज, ता. ३० : ब्रिस्क कंपनीने अचानक गोडसाखर कारखाना चालवण्यास नकार दिला. कारखाना ताब्यात घेवून स्वबळावर तो सुरु करण्याची हिमत आम्ही दाखविली. परंतु कारखाना सुरळीत सुरु राहिल्यास निवडणुकीत अडचणी वाढणार या भितीपोटी बारा संचालकांनी राजीनामे देवून कारखाना बंद पाडला. त्यांना आता सभासदांनी धडा शिकवावा, असे आवाहन अमर चव्हाण यांनी केले.
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे श्री काळभैरव शेतकरी-कामगार विकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. केडीसीसीचे संचालक संतोष पाटील, जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, ‘‘एक रुपयाचाही कारखान्यावर कर्ज नाही. तरीही कोणतीही वित्तीय संस्था अर्थसहाय्य करण्यास पुढे आली नाही. यामुळे श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालकांनी संस्था, व्यक्तींकडून ठेवी गोळा करुन कारखाना स्वबळावर सुरू करण्याची हिंमत आम्ही दाखविली. कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करावयाचा असेल तर सभासदांनी काळभैरव आघाडीला साथ द्यावी.
या वेळी मुन्नोळी व व्हसकोटी यांनी कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी सभासदांनी काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते. दरम्यान, नूल-नरेवाडी गटातील हलकर्णी, येणेचवंडी, बसर्गे आदी गावात आघाडीच्या उमदेवार व कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढली. सभासदांच्या घरोघरी जावून आघाडीची भूमिका मांडण्यात आली.