जागृतीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृतीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
जागृतीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जागृतीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

gad3013.jpg
गडहिंग्लज : स्नेहमेळाव्याला उपस्थित जागृती प्रशालेच्या २००२-०३ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक.

‘जागृती’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील जागृती प्रशालेच्या २००२-०३ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुतार, श्रीमती घुळान्नावर, माध्यमिक विद्यालयाचे श्री. गुरव, श्री. करगावे, श्रीमती चराटी, श्री. चौगुले या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराने गुरुजन भारावून गेले. शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. वर्गमित्र- मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी अमित देसाई, श्रीकांत मोहिते, बाबासाहेब चोथे, प्रवीण आडसुळे, अमोल सुतार, सागर कुंभार, रसिक पोवार, सनी मुळे, अभिजित दावणे, सरोजा खणदाळे, तेजस्विनी बेल्लद, तृप्ती माने, श्रीदेवी आगसगी, माधुरी साबळे, शुभांगी सावंत, पूजा घारवे, विमल सोळंकी, स्वागता घुगरे, सुगंधा वाळके, सारिका वाघ आदी उपस्थित होते. मेळाव्याचे नियोजन अमित देसाई, सरोजा खणदाळे व श्रीकांत मोहिते यांनी केले होते.