वृक्ष छाटलेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्ष छाटलेला
वृक्ष छाटलेला

वृक्ष छाटलेला

sakal_logo
By

59337
नागाळा पार्कमध्ये
वडाच्या झाडाची तोड

महापालिकेकडून हेरिटेज कायद्याचा भंग; कारवाईची मागणी

कोल्हापूर, ता. ३० ः राज्य शासनाने हेरिटेज वृक्ष कायदा लागू केला आहे. पण, महापालिका त्याची अंमलबजावणी करत असल्याबाबत शंका आहे. शहरातील जुने हेरिटेज वृक्ष खुलेआम तोडले जात आहेत. नुकताच नागाळा पार्क कमानीजवळच्या वडाच्या वृक्षाच्या सर्व फांद्या तोडल्या असून, केवळ बुंधा ठेवला आहे. अशी परवानगी दिलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
डॉ. बाचूळकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, शहर परिसरातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृक्षांना संरक्षण मिळावे यासाठी वृक्ष अधिसूचना कायदा लागू केला आहे. पण, काही दिवसांपूर्वी नागाळा पार्क कमानीजवळील मोठ्या आकाराच्या वडाच्या झाडाच्या सर्व फांद्या तोडल्या आहेत. फक्त खोडाचा बुंधा ठेवला आहे. हा हेरिटेज वृक्ष छाटण्यासाठी महापालिकेची मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे फांद्या तोडण्याची मान्यता कशी दिली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महापालिकेने राज्य शासनाच्या हेरिटेज वृक्ष कायद्याची अंमलबजावणी केली आहे का? तसेच शहरातील हेरिटेज वृक्षांची गणना केली आहे का? याबाबतची माहिती मिळावी. तसेच नागाळा पार्क येथील हेरिटेज वृक्षाबाबत वृक्ष प्राधिकरण समितीची नेमकी भूमिका काय आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन वृक्षाची आज काय स्थिती आहे, याची पाहणी केली का? याबाबत आवश्यक कार्यवाही करू संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.