शहर फुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर फुल्ल
शहर फुल्ल

शहर फुल्ल

sakal_logo
By

शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
पर्यटक मोठ्या संख्येने दाखल; पार्किंग फुल्ल

कोल्हापूर, ता. ३० ः दिवाळीच्या सुट्यांची पर्वणी साधत रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले. दिवसभर येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, रंकाळा पाहण्यासाठी गर्दी होती. यामुळे रस्त्यांवर बहुतांश पर्यटकांचीच वाहने दिसत होती.
दिवाळी झाल्यानंतर अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडले असून, तीन दिवसांपासून अंबाबाई दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. सहकुटुंब आलेले पर्यटक वाहने दसरा चौक वा बिंदू चौकात पार्किंगला उभे करून चालत मंदिराकडे जातात. त्यामुळे दसरा चौक ते बिंदू चौक दरम्यानच्या रस्त्यावर पर्यटकांची वाहने तसेच पर्यटकच दिसत होते. दर्शन घेऊन रंकाळा तसेच न्यू पॅलेसकडे जात होते. त्यानंतर पन्हाळा, जोतिबालाही जात होते. यामुळे शहरातील रस्त्यांवर मात्र वाहतुकीचा ताण जाणवत होता.
ंबिंदू चौकात पार्किंगसाठी वाहनांची रांग लागत असल्याने माधुरी बेकरीसमोरील, पद्मा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. तिथे शहर वाहतूक शाखेचे पोलिस असूनही वाहनांची संख्या जास्त असल्याने प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता. दुपारी बाराच्या सुमारास तर तेथील सर्वच रस्त्यांवर वाहनांची रांग लागलयाचे चित्र होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भवानी मंडपकडे जाणाऱ्या, चप्पल लाईनकडून जाणाऱ्या, माळकर तिकटीपासून भाऊसिंगजी रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर दिवसभर मोठी कोंडी होत होती. तसेच जेवणासाठी थांबणाऱ्या पर्यटकांमुळेही विविध हॉटेलच्या परिसरातील रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडत होती. दिवाळीनंतर सुरू झालेल्या पर्यटनामुळे व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.