महामार्ग बाधितांची मोटरसायकल रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग बाधितांची मोटरसायकल रॅली
महामार्ग बाधितांची मोटरसायकल रॅली

महामार्ग बाधितांची मोटरसायकल रॅली

sakal_logo
By

59314
गडहिंग्लज : संकेश्‍वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची निघालेली मोटरसायकल रॅली. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

महामार्ग बाधितांची
मोटारसायकल रॅली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : संकेश्‍वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज मोटारसायकल रॅली काढत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) ते आजऱ्यापर्यंत ही रॅली निघाली. महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रॅली काढली. दरम्यान, शनिवारी (ता. ५) परिषद होणार आहे.
संकेश्‍वर-बांदा या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत संघटना तयार केली आहे. बाधित क्षेत्रासाठी बाजारभावाच्या दहापट मोबदला द्यावा, मोबदल्यासाठी निवाडा नोटीस वहिवाटीप्रमाणे द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गावोगावी बैठका होत आहेत.
दरम्यान, आज दुपारी बाराच्या सुमारास मुत्नाळ येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव आदी उपस्थित होते. मुत्नाळपासून गडहिंग्लज मार्गे आजरा अशी ही रॅली निघाली. या मोटारसायकल रॅलीत महामार्ग बाधित शेतकरी सहभागी झाले होते.