इचल: प्रबोधिनी चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: प्रबोधिनी चर्चासत्र
इचल: प्रबोधिनी चर्चासत्र

इचल: प्रबोधिनी चर्चासत्र

sakal_logo
By

‘प्रसारमाध्यमांचे कर्तव्य व
जबाबदारी’वर ‘समाजवादी’त चर्चासत्र
इचलकरंजी, ता.30 ः न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या तीन स्तंभांबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांकडे पाहिले जाते. या चारही स्तंभाचे स्वतःचे असे अधिकार क्षेत्र आहे. पण आज मध्यप्रवाही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारत नाहीत. प्रसारमाध्यमे ही जनतेचा आवाज म्हणून काम करीत असतात. ते काम त्यांनी प्रामाणिकपणे करावे ही अपेक्षाही असते, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
‘प्रसारमाध्यमांचे कर्तव्य व जबाबदारी’ विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्रात भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रसारमाध्यमांच्या योगदानापासून आजच्या काळातील प्रसारमाध्यमांच्या भूमिकेपर्यंत तसेच सत्तेच्या आधारे होणाऱ्या दमनशाहीपासून आमिषशाहीपर्यंत विविध विषयांची चर्चा करण्यात आली. लोकशाहीमध्ये चारही स्तंभ आपापले कार्य करीत असताना अंतिम सत्ता लोकांची आहे. म्हणजेच आम जनतेची आहे याचे भान ठेवावेच लागते हे अधोरेखित करण्यात आले. चर्चेत प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे, तुकाराम अपराध, डी. एस. डोणे, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, महालींग कोळेकर, रामभाऊ ठिकणे, मनोहर जोशी, गजानन आंबी, आनंद जाधव सहभागी झाले होते.