निरोप समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोप समारंभ
निरोप समारंभ

निरोप समारंभ

sakal_logo
By

अपर जिल्हाधिकारी किशोर पवार
यांचा आज निवृत्तीनिमित्त सत्कार

कोल्हापूर, ता. ३० ः प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर अपर जिल्हाधिकारी किशोर पवार उद्या (ता. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचा उद्या दुपारी चारला सत्कार आयोजित करण्यात आला आहे. नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. पवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सुरवातीला फौजदार झाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा तहसीलदार परीक्षेत यश मिळवले. यापूर्वी कोल्हापुरात त्यांनी करवीर प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. वर्षभरापूर्वी त्यांची कोल्हापूरच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.