देवाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवाळे
देवाळे

देवाळे

sakal_logo
By

59379
देवाळे ः येथील देवाळे विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थिनी.
------------

देवाळे विद्यालयास माजी
विद्यार्थ्यांकडून स्मार्ट टीव्ही भेट

शिक्षकांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

देवाळे, ता. ३० : देवाळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या १९९६-९७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि विद्यार्थी-शिक्षक भेट शाळेच्या प्रांगणात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाबद्दल आजी-माजी शिक्षकांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छा कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू ठरला.
दहावी परीक्षा देऊन शाळेबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षांनंतर एकत्र आले. यावेळी मुख्याध्यापक जी. डी. भोसले यांनी शाळा राबवित असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देतानाच शाळा आणि विद्यार्थी यांचा ऋणानुबंध कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. बी. डी. खोत, व्ही. बी. लोहार, एस. ए. व्हारकट, एस. एस. पाटील, मधुकर ठिगळे या शिक्षकांनी तर आकाश शिंदे, सारिका पाटील, प्रवीण कुलकर्णी, जयसिंग पाटील, प्रा. वैशाली नांगरे, भारत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. आनंदा जाधव यांनी सूत्रसंचालन तर सचिन मोरे यांनी प्रास्ताविक केले. रमेश कांबळे यांनी आभार मानले. शिक्षिका आणि माजी विद्यार्थी संध्या पाटील यांचे सहकार्य लाभले.