चाणक्य प्रतिष्ठानचा उपक्रम आदर्शवत ः दास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाणक्य प्रतिष्ठानचा उपक्रम आदर्शवत ः दास
चाणक्य प्रतिष्ठानचा उपक्रम आदर्शवत ः दास

चाणक्य प्रतिष्ठानचा उपक्रम आदर्शवत ः दास

sakal_logo
By

59385
इचलकरंजी ः चाणक्य प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बोलतांना प्रा.अशोक दास.

चाणक्य प्रतिष्ठानचा उपक्रम आदर्शवत
प्रा.अशोक दास; विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
इचलकरंजी, ता. 30 ः समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबविण्याची वेळ येवू नये, यासाठी चाणक्य प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या हा उपक्रम आदर्शवत आहे. याचप्रमाणे प्रत्येकांनी समाजातील गरजूंसाठी दानशूर होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. अशोक दास यानी केले.
येथील चाणक्य प्रतिष्ठानच्यावतीने शैक्षणिक मदत केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या सांगली रोड वरील प्रधान कार्यालयातील रामभाऊ राशिनकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची आबाळ होवू नये, यासाठी चाणक्य प्रतिष्ठानने शैक्षणिक मदत वितरित करण्याची योजना राबवली आहे. गेल्या बारा वर्षापासून प्रतिष्ठानने जवळपास चौसष्ट लाख रुपयांची मदत करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण दूर केली आहे. तथापि, ही मदत तोडकी पडत आहे. त्यामुळे प्रतिष्ठानची मदत घेतलेल्यांनी आपलेच बांधव शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आपलाही खारीचा वाटा या कार्यात असावा, याकरीता आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्यात आला.
प्रतिष्ठानचे संस्थापक जवाहर छाबडा यानी प्रास्ताविक केले. अध्यक्ष राजेंद्र राशिनकर यांनी आभार मानले. चिंतामणी पारिशवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचा लाभ घेवून विविध खात्यात सेवा बजावत असलेले पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते. या उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठानने केलेल्या मदतीमुळे आमचे शिक्षण सुलभ झाले व आम्हाला आमच्या पायावर उभे राहता आले याबद्दल संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पुढील काळात संस्थेच्या या उपक्रमात आपणही सहभागी होवू असे, अभीवचन दिले.