नवीन सभागृहात १०८ कोटी खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन सभागृहात १०८ कोटी खर्च
नवीन सभागृहात १०८ कोटी खर्च

नवीन सभागृहात १०८ कोटी खर्च

sakal_logo
By

लोगो- 59581
-----
वर्षे ५, खर्च १०८ कोटी
..................................

-एवढा निधी मिळूनही
शहरातील रस्ते खड्ड्यातच

-कोल्हापूरकरांचा पैसा पाण्यात

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः निधीच्या कमतरतेचे कारण सांगितले जात असले तरी महापालिकेचे शेवटचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून (२०१५ नंतर) गेल्या वर्षीपर्यंत थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०८ कोटी ८७ लाख रुपये शहरातील रस्त्यांसाठी खर्च झाले आहेत. त्यामध्ये शासनाकडून आलेल्या निधीचाही समावेश आहे. महापालिकेनेच स्वनिधीतून ५५ कोटी ३७ लाख रस्त्यासाठी घातले आहेत. ही आकडेवारी प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकातील असून, इतका निधी खर्च केल्यानंतरही रस्ते खराब होतात, यातून एकतर दर्जा राखला जात नाही किंवा ढपला पाडला जात आहे, हे स्पष्ट होत आहे.
महापालिका देत असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये रस्त्यांची सुविधा महत्त्वाची आहे. त्यासाठी शहर अभियंता कार्यालय, चार विभागीय कार्यालये काम करतात. पण, गेल्या काही वर्षांपासूनचा अनुभव पाहता महत्त्वाच्या रस्त्यांच्या नियमित देखभालीकडे कानाडोळा झाला आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क नियमित केले असते तर आताची ही स्थिती ओढवली नसती. अनेक रस्त्यांचे मोठे पॅचवर्कचे काम केले. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या भागांतील खड्डे बुजवण्याचे कष्टच घेतले नाहीत. यामुळे आतापर्यंत विविध रस्त्यांवर मध्येच पॅचवर्कचा भाग चांगला, त्याच्या अलीकडे-पलीकडे खराब रस्ता ही स्थिती आहे. तसेच अनेक उपनगरांमध्ये रस्ते नाहीत म्हणून अंतर्गत रस्तेही केले गेले. त्यावेळी सत्ताधारी, त्यातीलही कारभारी असे काम होत आले. इतर ठिकाणी गरज असली तरी केवळ ताकदवान विरोधक, कुणी सतर्क लोकप्रतिनिधी नसल्याने रस्त्यांची कामे झालेली नाहीत.
५ वर्षांत शेकडो कोटींचा निधी खर्च झाला आहे. त्यातील पॅचवर्कच्या हेडखाली ५ कोटी ८७ लाख खर्च झाले असून, इतर हेडमधूनही पॅचवर्कसाठी खर्च केला आहे. नवीन सभागृह आल्यानंतरच्या पहिल्या वर्षात रस्त्यांसाठी ३५ कोटी १५ लाख खर्च झाले. त्यानंतर पुढील चार वर्षांत हा खर्च कमी कमी होत गेला. त्यामध्ये पॅचवर्क, स्वनिधीतून रस्ते, शासन निधीतून रस्ते, स्वनिधीतून ऐच्छिक निधीतून रस्ते अशा चार वेगवेगळ्या टप्प्यांतून कामे झाली आहेत. १०८ कोटी ८७ लाखांपैकी ५५ कोटी ३७ लाख महापालिकेचा स्वनिधी आहे. इतका निधी खर्च झाल्यानंतर तो योग्यप्रकारे खर्च झाला आहे की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे. अन्यथा शासनाकडून पुढील १०० कोटी मंजूर होतील व त्यातून काम झाल्यानंतर काही वर्षांनंतरच प्रशासन योग्यप्रकारे रस्ते दुरुस्तीसाठी जागे होईल.

चौकट
देखभालीची, कामाची
जबाबदारी निश्‍चित करा
नवरात्रोत्सवात प्रशासकांनी आदेश दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी रस्ते कामाच्या देखरेखीसाठी बाहेर पडले. अन्यथा नवीन रस्त्याच्या कामावेळी वा पॅचवर्कवेळीही कुणी अधिकारी नसतात. हा शहरवासीयांना अनुभव आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे असूनही पॅचवर्क झालेले नाही, ही स्थिती आहे. ही बाब देखभालीसाठी अधिकारी उपस्थित असल्यास निदर्शनास येऊ शकते. त्या-त्या विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली पाहिजे.

-----
चार्ट करणे

खर्चाचा विभाग
-वर्षे
-निधी

रस्ते दुरुस्ती पॅचवर्क
२०१६-१७ --६५,००,०००
१७-१८ ----१,६५,००,०००
१८-१९ ----१ ,८०, ००,०००
१९-२० ----१,२,००,०००
२०-२१----७५,००,०००


रस्ते स्वनिधीतून
२०१६-१७---४,५०,००,०००
१७-१८ ----२,५०,००,०००
१८-१९ ----२,५०,००,०००
१९-२० ----२,५०,००,०००
२०-२१---- १,५०,००,०००

रस्ते शासन निधी
२०१६-१७---२५,००,००,०००
१७-१८ ---- ७,००,००,०००
१८-१९ ----३,५०,००,०००
१९-२० ---- १५,००,००,०००
२०-२१-----३,००,००,०००

ऐच्छिक स्वनिधीतून
२०१६-१७---५,००,००,०००
१७-१८---६,००,००,०००
१८-१९ ---८,५०,००,०००
१९-२० ---१०,००,००,०००
२०-२१-----६,५०,००,०००