गड-निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-निवड
गड-निवड

गड-निवड

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad311.jpg : सुनीता नाईक59411
...
सुनीता नाईक राज्याच्या बेसबॉल प्रशिक्षिका
गडहिंग्लज, ता. ३१ : येथील साधना हायस्कूलच्या क्रीडाशिक्षिका सुनीता नाईक यांची महाराष्ट्र राज्य बेसबॉल मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच राष्ट्रीय सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा होत आहे. लुधियाना (पंजाब) येथे ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या बेसबॉल संघाची निवड करण्यात आली. या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर यांनी निवडीचे पत्र दिले. जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, सचिव राजेंद्र बनसोडे यांच्यासह साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर, संचालक अरविंद बारदेस्कर, मुख्याध्यापक जी. एस. शिंदे, पर्यवेक्षक आर. एन. पटेल यांचे सहकार्य मिळाले.