चिखलातील गोडसाखरचा हत्ती बाहेर काढू : मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलातील गोडसाखरचा हत्ती बाहेर काढू : मुश्रीफ
चिखलातील गोडसाखरचा हत्ती बाहेर काढू : मुश्रीफ

चिखलातील गोडसाखरचा हत्ती बाहेर काढू : मुश्रीफ

sakal_logo
By

59476
नूल : छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना हसन मुश्रीफ. समोर उपस्थित सभासद.

चिखलातील गोडसाखरचा
हत्ती बाहेर काढू : मुश्रीफ
शाहू समविचारी आघाडीची नूलमध्ये सभा
नूल, ता. ३१ : गैरकारभार आणि ढिसाळ नियोजनामुळे गोडसाखरचा हत्ती चिखलात रुतलेला आहे. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सत्ता द्या. रूतलेला हा हत्ती चिखलातून बाहेर काढू, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
नूल (ता. गडहिंग्लज) येथे श्री छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. वसंतराव नंदनवाडे अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले, ‘‘या निवडणुकीत भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक मतदान करा. कारखान्याची सध्याची जी परिस्थिती आहे तिला जबाबदार असणाऱ्या घटकांना दूर करा. ब्रिस्क कंपनीने अतिशय चांगला साखर कारखाना चालवला होता, परंतु या कंपनीला कारखाना सोडून जायला भाग पाडले.’’
डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, ‘‘२१ वर्षे अध्यक्षपद असूनही उमेदवारी भरायला त्यांची हिंमत होत नाही. जिल्ह्यातील अडचणीतील साखर कारखानदारी ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे.’’ राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ‘‘विरोधकांनी कारखान्याचे वाटोळे केले. त्यामुळेच मी चळवळीतील कार्यकर्ता असूनही विरोधकांच्या आघाडी सोबत राहिलो नाही.’’
या वेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचेही भाषण झाले. प्रा.किसनराव कुराडे, प्रकाश चव्हाण, सोमगोंडा आरबोळे, उदय जोशी, संग्रामसिंह कुपेकर, अप्पी पाटील, सुभाष शिंदे आदीसह उमेदवार व सभासद उपस्थित होते. वसंतराव नंदनवाडे यांनी स्वागत केले. जितेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक केले.