विश्वास देशमुख अभिवादन सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वास देशमुख अभिवादन सभा
विश्वास देशमुख अभिवादन सभा

विश्वास देशमुख अभिवादन सभा

sakal_logo
By

59545

प्रा. विश्वासराव देशमुख
यांचे कार्य आदर्शवत

पी. एस. कांबळे ः पहिल्या स्मृतिदिनी अभिवादन सभा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, दलितमित्र प्रा. विश्वासराव देशमुख यांचे कार्य आजही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत असल्याचे मत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पी. एस. कांबळे यांनी व्यक्त केले. प्रा. देशमुख यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे होते.
प्रा. शहाजी कांबळे, बाजीराव नाईक, युवराज गायकवाड, शशिकांत कांबळे, एम. आर. कांबळे, जयसिंग जाधव, एस. डी. कांबळे, अशोक पनोरीकर, सुशील कोल्हटकर, साताप्पा कांबळे यांनी मनोगतातून प्रा. देशमुख यांच्या कार्याला उजाळा दिला. बिद्री कारखान्याचे संचालक अशोक कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रकाश कांबळे, बबन कांबळे, साताप्पा कांबळे, बबन कांबळे, अशोक घाडगे, एस. डी. कांबळे उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे यांनी स्वागत केले. जिल्हा कार्याध्यक्ष आर. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले.