भाजप ‘योग्य’ उमेदवारांच्या पाठीशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप ‘योग्य’ उमेदवारांच्या पाठीशी
भाजप ‘योग्य’ उमेदवारांच्या पाठीशी

भाजप ‘योग्य’ उमेदवारांच्या पाठीशी

sakal_logo
By

gad318.JPG
गडहिंग्लज : भाजपच्या संघटनात्मक बैठकीत बोलताना विठ्ठल पाटील. समोर उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्ते.

भाजप ‘योग्य’ उमेदवारांच्या पाठीशी
संघटनात्मक बैठकीत निर्णय; कोणत्याही आघाडीला थेट पाठिंबा नाही
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीने प्रचाराचा निम्मा टप्पा ओलांडला आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा कोणाला याचा निर्णय होत नव्हता. पाठिंब्याबाबत संदिग्धता असल्याने हा चर्चेचा मुद्दा बनला होता. याबाबत आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक झाली. कोणत्याही आघाडीला थेट पाठिंबा न देता योग्य, सक्षम, अभ्यासू व स्वच्छ उमेदवाराच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल मल्हारच्या सभागृहात ही बैठक झाली.
अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील मुद्दा बैठकीत चर्चेला आला. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, अजित जामदार, मार्तंड जरळी, सुभाष चोथे, मारुती राक्षे, संदीप नाथबुवा, अनिल खोत, संतोष तेली, प्रा. अनिता चौगुले यांनी आपापली मते मांडली. कारखाना वाचला तर शेतकऱ्याला संजीवनी मिळण्यासारखे आहे. त्यामुळे कारखाना वाचला पाहिजे. कामगारांच्या चुली पेटल्या पाहिजेत. कारखाना भाजप वाचवू शकतो अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. निवडणुकीत योग्य, सक्षम, अभ्यासू व स्वच्छ उमेदवाराला मतदान करावे असा निर्णय घेण्यात आला.
विठ्ठल भमान्नगोळ, आप्पासाहेब पाटील, बी. एस. पाटील, राजू रुद्रापगोळ, संदीप रोटे, संतोष कल्याणी, सतीश हळदकर, अशिष साखरे, रमेश आरबोळे, अशोक पांडव, भीमा दुंडगे, राजू चव्हाण, कुमार देसाई, सुहास पाटील, महादेव नार्वेकर, संजय पाटील, संग्राम हसबे, प्रताप मोहिते, आप्पासाहेब कोड्ड, संतोष काडाप्पनावर, प्रशांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.