‘भडगाव-मुगळी’त काँटे की टक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भडगाव-मुगळी’त काँटे की टक्कर
‘भडगाव-मुगळी’त काँटे की टक्कर

‘भडगाव-मुगळी’त काँटे की टक्कर

sakal_logo
By

लोगो : गोडसाखर रणधुमाळी

‘भडगाव-मुगळी’त काँटे की टक्कर
राजकीय वर्तुळातून लक्ष; चव्हाण चुलत्या-पुतण्यांमध्ये लढत
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. उत्पादक गटातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष आहे. भडगाव-मुगळी उत्पादक गटातील उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर आहे. विशेषत: चन्नेकुप्पीतील प्रकाश चव्हाण व त्यांचे पुतणे अमर चव्हाण यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-जनता दल आघाडीतून अमर चव्हाण तर विरोधी भाजप आघाडीतून त्यांचेच बंधू उदय चव्हाण व चुलते प्रकाश चव्हाणांची उमेदवारी होती. तेंव्हा प्रकाश चव्हाण व अमर चव्हाण निवडून आले. या वेळी मात्र राजकीय चित्र वेगळे आहे. उदय चव्हाण रिंगणाबाहेर आहेत, तर बंधू अमर हे जनता दलाशी झालेल्या काळभैरव विकास आघाडीत सहभागी आहेत. प्रकाश चव्हाण हे हसन मुश्रीफ-प्रकाश शहापूरकर यांच्या राजर्षी शाहू समविचारी आघाडीतून लढत आहेत. पंधरा वर्षापासून चव्हाण चुलत्या-पुतण्यांची राजकीय इर्षा तालुक्याला ज्ञात आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यातील काँटे की टक्कर राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेते. या पार्श्‍वभूमीवर आताच्या गोडसाखर निवडणुकीतील त्यांची लढत चुरशीची होणार आहे.
दुसऱ्या बाजूला गिजवणेचे सतीश पाटील शाहू समविचारी, तर बाबासाहेब पाटील काळभैरव विकास आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. गतवेळच्या निवडणुकीत सतीश पाटील व अमर चव्हाण दोघेही राष्ट्रवादी-जनता दल आघाडीतून आघाडीतून निवडून आले. परंतु, गेल्या वर्षभरातील गोडसाखर कारखान्यातील अंतर्गत राजकीय कलहामुळे हे एकाच पक्षाचे दोघेही एकमेकांचे राजकीय शत्रू झालेत. सध्या गोडसाखरच्या प्रचारात त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजत आहेत. यामुळे त्यांची लढतही लक्षवेधी ठरत आहे. गतवेळी पराभूत झालेले बाबासाहेब पाटील या वेळी पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. सतीश व बाबासाहेब पाटील हे राजकीय विरोधक मानले जातात. यामुळे त्यांच्यातील लढत प्रतिष्ठेची ठरणारी आहे.
-----------
चौकट
गटात ३७०९ मतदार
भडगाव-मुगळी गटात ३७०९ मतदारसंख्या आहे. विशेष म्हणजे भडगाव हे सर्वात मोठे गाव व सभासद संख्या सातशेच्या घरात असूनही दोन्ही आघाडीकडून येथील एकही उमेदवार दिलेला नाही. गतवेळच्या निवडणुकीतही हे गाव उमेदवारीपासून वंचित होते.
-----------
गतवेळचे विजयी उमेदवार
- अमर चव्हाण : ८३२७
- सतीश पाटील : ८१०९
- प्रकाश चव्हाण : ८०२८