पाणी कनेक्शन तोडणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी कनेक्शन तोडणे
पाणी कनेक्शन तोडणे

पाणी कनेक्शन तोडणे

sakal_logo
By

L59577
...

पाणीपट्टी विशेष मोहिमेअंतर्गत
४३ कनेक्शन तोडली

११ लाख ५६ हजार वसूल

कोल्हापूर, ता. ३१ : शहर पाणीपुरवठा विभागाने १९ ते ३१ ऑक्टोबरअखेर थकबाकीपोटी ४३ कनेक्शन तोडली. तसेच ९८ थकबाकीदारांकडून ११ लाख ५६ हजार ८१ रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यात आली.
शहर व ग्रामीण परिसरातील पाडळी, शिंगणापूर, बोंद्रेनगर, जरगनगर, आर. के. नगर, राजेंद्रनगर, शाहू नाका, सरनाईक वसाहत, उद्यमनगर, सम्राटनगर, मध्यवर्ती बसस्थानक, कावळा नाका, कदमवाडी व विक्रमनगर या भागांतील कनेक्शनधारकांवर कारवाई केली आहे. ९८ थकबाकीदारांकडून ११ लाख ५६ हजार ८१ रुपये इतकी थकीत रक्कम वसूल केली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता हर्षजित घाटगे व पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. थकबाकीदारांनी बिलाची रक्कम त्वरित भरून कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे असे प्रसंग टाळावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.