रस्ते दर्जा, अहवाल मागवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते दर्जा, अहवाल मागवला
रस्ते दर्जा, अहवाल मागवला

रस्ते दर्जा, अहवाल मागवला

sakal_logo
By

६५ रस्ते कामाचे होणार पोस्टमार्टम
प्रशासकांनी घेतली कडक भूमिका, तीन दिवसांत मागवला अहवाल

कोल्हापूर, ता. ३१ ः शहरातील खराब रस्त्यांवरून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज कडक भूमिका घेत विभागीय कार्यालयांच्या उपशहर अभियंत्यांना खडे बोल सुनावले. तसेच शासनाच्या मूलभूत सेवा-सुविधा अनुदानातील ५८ रस्ते, तर महापालिकेच्या स्वनिधीतील डांबरी पॅचवर्कच्या सात रस्ते कामाच्या तपासणीचे अतिरिक्त आयुक्तांसह दोन उपायुक्त, मुख्य लेखा अधिकारी, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांना आदेश दिले आहेत.
शासनाच्या मूलभूत सेवा-सुविधा अनुदानातील ५८ तर महापालिका स्वनिधीमधून डांबरी पॅचवर्कच्या ७ कामांना मंजुरी दिली होती. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज दिवसभर चारही उपशहर अभियंत्यांकडून रस्ते, तसेच इतर कामांचा आढावा घेतला. रस्ते कामाबाबत कडक भूमिका घेत नवीन कामे दर्जात्मक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर विभागीय कार्यालयाअंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामाची व दर्जाची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांसह पाच अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढले. खड्डे पडून अनेक रस्ते खराब झाले आहेत. काही दोष दायित्व (DLP) कालावधीमध्येही खराब झाले आहेत. ते दुरुस्त झालेले नाहीत. या कामांची अधिकाऱ्यांनी पाहणी करून कामाचा दर्जा व सद्यस्थितीबाबत जीओ टॅग फोटोसह तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. बलकवडे यांनी आदेशात दिल्‍या आहेत.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे विभागीय कार्यालय ३ अंतर्गत अनुदानातील ८ व पॅचवर्कच्या २ कामांची जबाबदारी दिली आहे. उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे विभागीय कार्यालय १ अंतर्गत अनुदानातील २७ कामांची व मुख्य लेखा अधिकारी सुनिल काटे यांच्याकडे अनुदानातील ९, पॅचवर्कच्या २ कामांची जबाबदारी आहे. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी विभागीय कार्यालय २ अंतर्गत अनुदानातील १० व पॅचवर्कच्या एका कामाचा अहवाल द्यायचा आहे. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी यांच्याकडे विभागीय कार्यालय ४ अंतर्गत अनुदानातील ४ व पॅचवर्कच्या २ कामांची जबाबदारी आहे.