६३ रस्ते करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६३ रस्ते करणार
६३ रस्ते करणार

६३ रस्ते करणार

sakal_logo
By

मनपा ... लोगो
.........

डिसेंबरअखेर ६० रस्ते करणार

महापालिकेने दिली समितीला यादी; वॉरंटीमधील १९ कामेही होणार

कोल्हापूर, ता. ३१ ः शहरातील खराब झालेले तसेच नव्याने करावयाच्या ६० रस्त्यांशिवाय वॉरंटी कालावधीतील खराब झालेले १९ रस्ते नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत केले जाणार असल्याचे पत्र महापालिकेने शहर कृती समिती तसेच रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आज दिले. त्यामुळे आता स्थगित केलेल्या महापालिकेला घेराओ आंदोलनाबाबत समिती सदस्य उद्या निर्णय घेणार आहेत.
शहरातील खराब रस्‍त्यांबाबत जोरदार टीका झाल्यानंतर रिक्षा संघटनांच्या वतीने महापालिकेला घेराओ घालण्याचा इशारा दिला होता. नागरिकांचा या विषयाबाबत वाढत चाललेल्या संतापाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संघटना तसेच कृती समितीचे पदाधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी बैठकीत ठरल्यानुसार कोणते रस्ते किती कालावधीत पूर्ण करणार, कोणते रस्ते दुरुस्त करणार याचे वेळापत्रक महापालिकेने समितीला द्यायचे ठरले होते. त्यानुसार रविवारपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली होती. प्रत्येक विभागीय कार्यालयनुसार नवीन रस्ते, दुरुस्तीचे रस्ते, वॉरंटीमधील रस्ते दुरुस्ती याची यादी तयार केली जात होती. सोमवारी सायंकाळी यादी तयार झाली. चारही कार्यालयांतर्गत ६० रस्त्यांची कामे केंव्हा सुरू होणार व केंव्हा पूर्ण करणार हे यादीत दिले आहे. १ नोव्हेंबर पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व कामे पूर्ण केली जातील असे समितीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रशासनाच्या वतीनेही सोमवारी कंत्राटदारांना महापालिकेत बोलवून तातडीने व दर्जात्मक काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करण्यात येणार आहेत.
विभागीय कार्यालय १ अंतर्गत १५ रस्ते असून २ कोटी ४३ लाख मंजूर आहेत. दोन नंबर कार्यालयांतर्गत १९ रस्ते मंजूर असून ३ कोटी३१ लाखांचा निधी मंजूर आहे तीन नंबर कार्यालयाच्या अखत्यारित सर्वाधिक २० रस्ते करायचे आहेत. त्यासाठी २ कोटी ९२ लाख निधी मंजूर आहे. तर चार नंबर कार्यालयांतर्गत ६ रस्ते केले जाणार असून ७४ लाखांचा निधी मंजूर आहे. याशिवाय वॉरंटी कालावधीतीलही १९ हून अधिक रस्ते दुरूस्त करून घेतले जाणार आहेत.
............
असे आहेत प्रमुख रस्ते व परिसर

कोंडा ओळ ते शारदा कॅफे, रंकाळा स्टॅंड ते गंगावेश दूधकट्टा, शिवाजी उद्यमनगरमधील अंतर्गत रस्ते, साईक्स एक्स्टेंशन ते परीख पूल, आपटेनगर-तुळजाभवानी मंदिर, सुर्वेनगर, साळोखेनगर, राजेंद्रनगर, रायगड कॉलनी, नेहरूनगर, कळंबा फिल्टर हाऊस परिसर, संभाजीनगर वारे वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, बिंदू चौक परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, राजारामपुरी, सुभाषनगर, नक्षत्र पार्क कॉलनी, शिवाजी पार्क, बापट कॅम्प, मार्केट यार्ड.
........


‘काही कामांना आता सुरूवात झाली आहे. नोव्हेंबर तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. ती गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत यासाठी कंत्राटदारांना बोलवून सूचना दिल्या जात आहेत.
-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता