विद्यापीठ निवडणूक अर्ज छाननी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ निवडणूक अर्ज छाननी बातमी
विद्यापीठ निवडणूक अर्ज छाननी बातमी

विद्यापीठ निवडणूक अर्ज छाननी बातमी

sakal_logo
By

विद्यापीठ निवडणुकीत
काही जागा बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः शिवाजी विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये शिक्षक आणि पदवीधर गटातील दोन अर्ज बाद झाले. एकूण चार अर्ज बाद झाले. बुधवारी (ता. २) अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा आणि विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये दुपारपर्यंत चार अर्ज बाद झाल्याची माहिती समजली. यामध्ये शिक्षक आणि पदवीधर गटातील अर्ज आहेत. या शिवाय विद्या परिषद, अभ्यास मंडळे या जागांवरही अर्ज बाद झाल्याने बऱ्याच जागा बिनविरोध झाल्या आहेत.