कुलगुरू डॉ.शिर्के निवड बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलगुरू डॉ.शिर्के निवड बातमी
कुलगुरू डॉ.शिर्के निवड बातमी

कुलगुरू डॉ.शिर्के निवड बातमी

sakal_logo
By

(डॉ.डी.टी.शिर्के यांचा फोटो वापरणे)
........

कर्मवीर भाऊराव पाटील समूह
विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शिर्के

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठचे (क्लस्टर युनिव्हर्सिटी) पहिले कुलगुरू होण्याचा मान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना मिळाला. आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या विद्यापीठात यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय या तीन संस्थांचा समावेश आहे.
समूह विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने मे २०२१ मध्ये निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच मे २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समूह विद्यापीठ स्थापण्यावर शिक्कामोर्तब झाले. आज कुलगुरूपदासाठी डॉ. शिर्के यांची घोषणा केली. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी समूह विद्यापीठ ही संकल्पना राबविली जात आहे. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. कुलपती कार्यालयाच्या आदेशानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी यासंबंधीचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
-------------

‘माझ्या निवडीने शिवाजी विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. या विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांचे क्लस्टर होऊन विद्यापीठ झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वसा जपणाऱ्या रयत संस्थेत योगदान देण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू
---------------------
तीन विद्यापीठांचे कुलगुरू
डॉ. डी. टी. शिर्के हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त पदभारही आहे. तसेच आता ते कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे नूतन कुलगुरू झाले आहेत. त्यामुळे सध्या ते तीन विद्यापीठांचे कुलगुरू आहेत.
-------------------