रेशनच्या तांदळात गुटख्याची पुडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशनच्या तांदळात गुटख्याची पुडी
रेशनच्या तांदळात गुटख्याची पुडी

रेशनच्या तांदळात गुटख्याची पुडी

sakal_logo
By

59600

रेशनच्या तांदळात गुटख्याची पुडी
गगनबावडा : तालुक्यातील एका रेशन दुकानांमध्ये धान्यवाटप होत असताना दुकानातील एका तांदळाच्या पोत्यात गुटखा खाल्लेली पुडी आढळल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त करण्यात आला. रेशन दुकानदारास विचारले असता ते म्हणाले, ‘‘ही पोती काही जिल्हा पुरवठा विभागाकडून पॅकिंग होऊन येतात. घडलेल्या घटनेबाबत विभागाला कळवू’’. गगनबावडा तालुका हा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे आधार मिळतो तो सरकारी रेशनच्या मिळणाऱ्या धान्यात असे प्रकार आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा विभाग व गगनबावडा पुरवठा विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.