गड-बालनाट्य रौप्य पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-बालनाट्य रौप्य पदक
गड-बालनाट्य रौप्य पदक

गड-बालनाट्य रौप्य पदक

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad११.jpg
L५९६१८
पुणे : राज्य बालनाट्य स्पर्धेतील स्त्री अभिनयाचे रौप्यपदक अर्णवी उपराटे हिला प्रदान करताना मेघराज राजेभोसले, सुनीता अस्वले.
----------------------------
राज्य बालनाट्यात अर्णवीला रौप्यपदक
गडहिंग्लज : राज्य बालनाट्य स्पर्धेत येथील गडहिंग्लज कला अकादमीच्या अर्णवी उपराटे हिने स्त्री अभिनयाचे रौप्यपदक पटकाविले होते. भरत नाट्यमंदिर (पुणे) येथे झालेल्या कार्यक्रमात त्याचे वितरण झाले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते अर्णवीला पदक प्रदान करण्यात आले. पुणे येथे १८ वी राज्य बालनाट्य स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत गडहिंग्लज कला अकादमीने मदर्स डे हे बालनाट्य सादर केले होते. यात अर्णवीने मिरची ही स्त्री व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या अभिनयाची दखल घेत स्त्री अभिनयाच्या रौप्यपदकासाठी निवड झाली होती. भरत नाट्य मंदिरात पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. मेघराज भोसले यांच्या हस्ते अर्णवीला रौप्यपदक प्रदान करण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालिका सुनीता अस्वले उपस्थित होत्या.