निर्मला शेवाळे यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्मला शेवाळे यांना पुरस्कार
निर्मला शेवाळे यांना पुरस्कार

निर्मला शेवाळे यांना पुरस्कार

sakal_logo
By

59622
निर्मला शेवाळे

निर्मला शेवाळे यांना पुरस्कार
गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कवयित्री निर्मला शेवाळे यांच्या पुसट रेषेच्या आत बाहेर या काव्यसंग्रहाला राष्ट्रीय संत नामदेव काव्य साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनातर्फे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संयोजक डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. निर्मला शेवाळे या आनंदिता या नावाने लेखन करतात. त्यांचे आतापर्यंत आशावादी कवडसे, प्रेमगंध व पुसट रेषेच्या आत बाहेर हे काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहाना मिळालेला हा चौथा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आहे.