वृत्तपत्र पत्रलेखक संघटना गौरवअंक प्रकाशित करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र पत्रलेखक संघटना 
गौरवअंक प्रकाशित करणार
वृत्तपत्र पत्रलेखक संघटना गौरवअंक प्रकाशित करणार

वृत्तपत्र पत्रलेखक संघटना गौरवअंक प्रकाशित करणार

sakal_logo
By

वृत्तपत्र पत्रलेखक संघटना
गौरव अंक प्रकाशित करणार
बैठकीत निर्णय; रौप्यमहोत्सवानिमित्त उपक्रम
इचलकरंजी, ता. १ : इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित बैठकीमध्ये लोकजागर गौरव अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सामाजिक बांधिलकीचा वसा व वारसा जपणाऱ्या वृत्तपत्र पत्रलेखकांची ही संघटना गेली पंचवीस वर्षे सातत्यपूर्ण कार्यरत आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या पत्रलेखकांना एकत्रित करणारी ही संस्था आहे. संस्थेतर्फे वृत्तपत्र पत्रलेखन प्रशिक्षण व अनेकविध उपक्रम सातत्यपूर्ण पद्धतीने राबविले जातात. दरमहा उत्कृष्ट वृत्तपत्र पत्रलेखकांना ‘आचार्य शांताराम गरुड पत्रलेखन पुरस्कार’ देऊन गौरवित केले जाते. अशा या संघटनेचा रौप्यमहोत्सव राज्यव्यापी स्वरुपात मेळावा घेण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे, उपाध्यक्ष पंडित कोंडेकर, सचिव मनोहर जोशी, अभिजित पटवा, रमेश सुतार यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.