दानोळी हायस्कुलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दानोळी हायस्कुलमधील 
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
दानोळी हायस्कुलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

दानोळी हायस्कुलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

59669
दानोळी : स्नेहसंमेलनात एकत्र आलेले दानोळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी.

दानोळी हायस्कूलमधील
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
दानोळी, ता. १ : दानोळी हायस्कूलच्या दहावीच्या सन १९९८-९९ मधील विद्यार्थ्यांची भेट तब्बल २३ वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा व तत्कालीन आठवणींना उजाळा दिला. विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमांतून स्नेहसंमेलनाचे वेगळेपण राखले.
मित्रांनी केलेली प्रगती पाहून एकूण सर्वांना अभिमान वाटला. तर काहीची आयुष्यातील धडपड पाहून डोळे पाणावले. शर्मिला पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शांतिकुमार रूकडे, रमेश माने, अनिल पाटील यांनी पुढाकार घेऊन अडचणीत असलेल्या वर्गमित्राला भरघोस मदत करून मैत्रीचे कर्तव्य पार पाडले. फनी गेम्स, संगीत कार्यक्रमाचा झाला. विजय शिंदे, सोमनाथ माने यांनी स्मृतिचिन्ह दिले. मुलींना एकत्र करणेसाठी गेली तीन महिने सविता पोवार, शर्मिला पाटील, त्रिशला पाटील यांनी अविरत प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन सतीश शिंदे, अहमद शिकलगार, रवींद्र पाटील, संदीप बोरचाटे, सुहास भोपळे, प्रदीप पाराज, नितीन लोहार, महेश दळवी, प्रवीण मसवाडे, अशोक पिंगुळकर यांनी केले.