आजऱ्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव
आजऱ्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव

आजऱ्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव

sakal_logo
By

आजऱ्यात वाढतोय लम्पीचा प्रादुर्भाव
चार बळी; ३० जनावरांना लागण, पशुपालकांची अनास्था
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः आजरा तालुक्यात लम्पीचा (स्कीन डिसीज) हा गोवंशातील एक नवीन साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दीड महिन्यात तालुक्यात ३० जनावरांना या रोगाची लागण झाली. यामध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय विभागाचे लम्पी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण पशुपालकांकडून अपेक्षित प्रतिसाद नसून त्यांना आजही आजाराचे गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात पेंढारवाडी येथे लम्पीची सुरुवात झाली. तालुक्यातील उत्तूर विभागातील काही गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये उत्तूर व बहिरेवाडतील जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण मोठे आहे. बहिरेवाडीमध्ये २६ जनावरे लम्पीग्रस्त आढळली. यामध्ये तीन बैल व एक वासरू यांचा मृत्यू झाला आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी तालुका प्रशासनासह पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील आहे. पण त्यांना पशुपालकांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. जनावरांचा आठवडी बाजार बंद असून खरेदी विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. तरीही तालुक्यात अवैध मार्गाने जनावरे आणली जात आहेत. सुगी सुरू असल्याने जनावरे खरेदीचे प्रमाण छुप्प्या रितीने सुरू आहे. त्यामुळे लम्पीचा प्रसार व नियंत्रण करणे कठीण बनल्याचे पशुवैद्यकीय विभाग सांगतो. पशुवैद्यकीय विभाग व गोकुळ दुध संघाने तालुक्यातील सुमारे ७ हजार ६३८ जनावरांचे लसीकरण केले आहे. हे खरे असले तरी लम्पी रोखणे अडचणीचे झाले आहे. लम्पीवर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्यप्रकारे प्रबोधन करण्याची गरज आहे. अन्यथा हा आजार सर्वत्र पसरण्याची भीती आहे.
--------------------
* सुगी ठरतेय अडसर
आजरा तालुक्यात भात कापणी, भुईमूग काढणी, नागली शेंडलणी या कामांना वेग आला आहे. या कामासांठी जनावरांची गरज असते. त्यामुळे अन्य तालुके व सीमावर्ती भागातून जनावरे खरेदी केली जात आहे. त्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे.