स्तूती कार्यशाळा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तूती कार्यशाळा बातमी
स्तूती कार्यशाळा बातमी

स्तूती कार्यशाळा बातमी

sakal_logo
By

59725
स्तुती कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी

........

विद्यापीठांत अत्याधुनिक
उपकरणांची सुविधा असावी
---
प्रा. डॉ. एलांगनन अरुणन यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः विद्यापीठांमध्ये विविध विषयांवरील महत्त्वाचे संशोधन केले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाच्या काळातच जर संशोधनासाठीची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झाली तर त्यांचा उत्साह वाढेल. यासाठी प्रत्येक विद्यापीठात अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) संस्थेच्या असेंद्रिय आणि भौतिक रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एलांगनन अरुणन यांनी केले. आज त्यांच्या हस्ते स्तुती कार्यशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शिवाजी विद्यापीठात स्तुती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात सात दिवस श्रीनगर, दिल्ली, बंगळूर, गोवा, मुंबई, पुणे येथील १४ संशोधकांची व्याख्याने होणार आहेत. विविध प्रतिष्ठित संस्थांमधून येणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापक व्याख्याते अतिशय प्रगतिशील उपकरणावर तांत्रिक बाबींची माहिती सर्वांना देणार आहेत. आज पहिल्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू प्रा. अरुण सावंत आणि प्रा. डॉ. अरुणन यांनी आपल्या विषयावर सहभागींना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सर्व सहभागी शिक्षक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांना सैफ केंद्रातील उपकरणांच्या गटानुसार प्रात्यक्षिक दिले गेले. सहभागींपैकी काहींनी आणलेले सॅम्पलही येथे टेस्ट करून दिले.
या वेळी सैफ केंद्राचे प्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम देशभर राबविले जात आहेत. अशा प्रकारच्या स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे अनेक विद्यार्थी, संशोधक शिक्षक आणि उद्योगपतींना त्यांच्या नवनवीन कल्पना व संशोधन उच्चस्तरावर देण्यास, त्याच प्रकारे अत्याधुनिक उपकरणांशी परिचित होण्यास मदत होईल.
या वेळी प्रा. सावंत, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. पी. एस. पाटील, डॉ. के. डी. पवार, डॉ. डी. एस. भांगे व विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थित होते. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्तुती प्रकल्पाचे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी डॉ. मकसूद वाईकर यांनी आभार मानले.