डेंगी औषध फवारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी औषध फवारणी
डेंगी औषध फवारणी

डेंगी औषध फवारणी

sakal_logo
By

59792

शिवाजी पेठेत ५८ घरांची तपासणी
डेंगीने बालकाचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी

कोल्हापूर, ता. १ : शिवाजी पेठेत डेंगीने दहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. आज साकोली कॉर्नरजवळील माळी गल्ली परिसरातील ५८ घरांची तपासणी केली. त्यातील ४ घरांमधील ६ कंटेनर दूषित आढळले. या ठिकाणी औषध फवारणी, धुर फवारणी करण्यात आली.
नागरी केंद्रामार्फत दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित तापाच्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. शहरामध्ये इतर ठिकाणी २९० घरांची तपासणी करण्यात आली. यात २९० कंटेनरची तपासणी करुन ११ घरांमधील १६ कंटेनर दुषित आढळले. लक्षतीर्थ वसाहत, भोई गल्ली, लक्ष्मीपुरी, कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ, बेलबाग, यल्लामा मंदीरजवळ, बीडी कामगार चाळ या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून नारळाच्या करवंट्या, खराब डबे, वापरात नसलेले टायर यांची विल्हेवाट लावावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, फ्रिजमागील पाण्याचे ट्रे, झाडाच्या कुंडयात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.