भाजप बैठक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप बैठक बातमी
भाजप बैठक बातमी

भाजप बैठक बातमी

sakal_logo
By

59789
.......

महाराष्ट्रातील सहकाराचा विस्तार करा

भाजपचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकारातील जाणकार आहेत. आपण महाराष्ट्रातील सहकारी चळवळ अजून चांगल्या पद्धतीने चालवून आणखी सहकारी प्रकल्प, योजना उभा करून सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. सहकाराचा विस्तार करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी केले. कार्यकर्त्यांच्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
भाजपच्या ग्रामीण आणि शहरस्तरावरील कार्यकर्त्यांची आज त्यांनी बैठक घेतली. यावेळी शिवप्रकाश म्हणाले, ‘आठ वर्षांत नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, याचा लाभ सर्वांना होत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशांमध्ये अनेक मोठे निर्णय होत असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरदेखील देशाचे नाव उंचावले गेले आहे. मुद्रा, जनधन, उज्ज्वला गॅस, मातृवंदन, किसान समृद्धी, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास, गरीब कल्याण अशा अनेक योजना अजूनही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केले पाहिजे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे जाळे आणखी मजबूत कसे होईल याकडे लक्ष घालण्यात सक्षम आहेत. आपल्याला महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आणखी चांगल्या पद्धतीने चालवून आणखी सहकारी प्रकल्प, योजना महाराष्ट्रात उभा करून सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, निवडणूकप्रमुख प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हळवणकर, विभाग कार्यालयप्रमुख योगेश बाचल, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, दिलीप मैत्रिणी, महेश जाधव, हिंदुराव शेळके, अशोक देसाई, नाथाजी पाटील, विजय जाधव आदी उपस्थित होते.