शालेय विभागास राष्ट्रीय स्पर्धा परवानगी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय विभागास राष्ट्रीय स्पर्धा परवानगी द्या
शालेय विभागास राष्ट्रीय स्पर्धा परवानगी द्या

शालेय विभागास राष्ट्रीय स्पर्धा परवानगी द्या

sakal_logo
By

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याची
परवानगी शालेय विभागास द्या

कृती समितीची पंतप्रधानांकडे ईमेलद्वारे मागणी

कोल्हापूर, ता. १ : दोन संघटनेतील वादामुळे रखडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याची परवानगी शालेय विभागास देण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पंतप्रधान यांना ईमेलद्वारे केली. यामध्ये म्हटले आहे की, देशामध्ये प्रथमच खेलो इंडियासारखे क्रीडा विशेष व्यासपीठ निर्माण करून देशातील राज्यातील जिल्यातील तालुक्यातील व गावातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक स्पर्धेची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे असताना देशामध्ये शालेय स्पर्धांसाठी दोन मोठ्या संघटना असतानाही अंतर्गत राजकारणामुळे कोणत्याही संघटना शालेय खेळ घेण्याच्या पात्रतेत नसल्यामुळे व केंद्रीय क्रीडा विभागाने परवानगी दिलेली नाही. यामुळे फेडरेशनच्या अंतर्गत वादामुळे व राजकारणामुळे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील बऱ्यापैकी राज्यातील राजस्तरीय स्पर्धा होऊन राष्ट्रीय स्पर्धेची खेळाडू वाट पहात आहेत. अशा स्थितीत फेडरेशनच्या अंतर्गत वादाने राष्ट्रीय स्पर्धेचे भविष्य अंधारात आहे, असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की आपल्या अधिकारात केंद्रीय क्रीडा व शालेय विभागास राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचे आदेश द्यावेत, अशी मागणी कृती समितीकडून रमेश मोरे, अशोक पोवार, भाऊ घोडके, समीर चौगुले, किरण भोसले, नीलेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, लहुजी शिंदे, पप्पू सुर्वे, महेश पाटील, कादर मलबारी, चंद्रकांत पाटील, राजू मालेकर, महेश जाधव यांनी केली.