फोटो ओळ..आर.के.नगर बाजारपेठेत विविध रंगांची फुले विक्री करताना कंदलगावचे फुल उत्पादक शेतकरी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..आर.के.नगर बाजारपेठेत विविध रंगांची फुले विक्री करताना कंदलगावचे फुल उत्पादक शेतकरी.
फोटो ओळ..आर.के.नगर बाजारपेठेत विविध रंगांची फुले विक्री करताना कंदलगावचे फुल उत्पादक शेतकरी.

फोटो ओळ..आर.के.नगर बाजारपेठेत विविध रंगांची फुले विक्री करताना कंदलगावचे फुल उत्पादक शेतकरी.

sakal_logo
By

आर. के. नगर ः बाजारपेठेत विविध रंगांची फुले विक्री करताना कंदलगावचे फूल उत्पादक शेतकरी.

आर. के. नगर बाजारपेठेत
कंदलगावच्या फुलांचा सुगंध

कंदलगाव, ता. १ : कंदलगावात फूल शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. चार-पाच वर्षांपासून फुलशेतीत आधुनिकता आल्याने जुनी फुलेही वेगवेगळ्या रंगात उमलत असल्याने बाजारपेठेत त्यांची किंमतही वाढली आहे.
कंदलगावच्या शेतीत शेवंती, मिरची फूल, मोगरा, निशिगंध, मखमल, झेंडू, गलाटा, बटन गुलाब, गुलाब ही विविध रंगांतील फुले बारमाही मिळत असल्याने व आर. के. नगरसारखी बाजारपेठ जवळच मिळाल्याने फूल उत्पादकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहरात मिळणाऱ्या सर्व वस्तू, गृहपयोगी साहित्य आर. के. नगर बाजारपेठेत मिळत असल्याने कंदलगाव, पाचगाव, मोरेवाडी या गावासह स्थानिक नागरिकांची खरेदीसाठी होणारी पायपीट कमी झाली आहे. व्यापारी संकुल चौकात सर्व प्रकारच्या भाजीपाल्यासह सध्या रंगीबेरंगी विविध जातीच्या फुलांची दरवळ होत असल्याने ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे. रणदिवे, बाबर, पुंदिकर, पाटील, निर्मळ, संकपाळ, हिंदूळे, अतिग्रे या कुटुंबातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलशेती करतात.

कोट
सेंद्रिय पद्धतीतून उत्पादित भाजीपाला, फुले यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. आर. के. नगर बाजारपेठ कंदलगावच्या शेतकऱ्यांना जवळीची व फायदेशीर ठरत आहे.
- आनंदा पुंदिकर, भाजीपाला उत्पादक

कोट
आधुनिक तंत्रज्ञानाने फुलशेतीत बदल होऊन ग्राहकांना वेगवेगळ्या रंगांत सर्वच फुले मिळतात. मात्र, उत्पादन व कष्ट याचा विचार केला तर पदरी निराशाच आहे. बाजारपेठेत योग्य भाव मिळावा.
- कविता विजय पाटील, फूल उत्पादक शेतकरी