अंबाबाई मंदिरात यादवकालीन शिलालेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिरात यादवकालीन शिलालेख
अंबाबाई मंदिरात यादवकालीन शिलालेख

अंबाबाई मंदिरात यादवकालीन शिलालेख

sakal_logo
By

५९८१०
कोल्हापूर ः अंबाबाई मंदिरात सापडलेला शिलालेख.

अंबाबाई मंदिरात आढळला
बाराव्या शतकातील शिलालेख
यादवकालीन; दगडी बांधकामात वापर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या बांधकामातील एक दगड शिलालेख असल्याचे आज स्पष्ट झाले. मंदिरातील संगमरवरी फरशा काढण्याचे काम सुरू आहे. फरशी काढल्यानंतर हा शिलालेख उजेडात आला आहे. तो बाराव्या शतकातील यादवकालीन आहे.
सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्व भिंतीमध्ये हा आडवा दगड असून, संस्कृत व देवनागरी लिपीत शिलालेख आहे. एकूण सोळा ओळींच्या या शिलालेखाचे भाषांतर झाल्यानंतर देवस्थान समितीतर्फे शिलालेखावरील मजकूर प्रसिद्धीस दिला जाणार असल्याचे समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. साधारण दोन फूट लांब व एक फूट रुंद शिलालेख असून, मूळ मंदिराचा भाग असलेल्या भिंतीवर तो आहे. त्याचे भाषांतर झाल्यानंतर त्यावरील मजकूर नेमका काय आहे, याची स्पष्टता होणार आहे.