शिवाजी विद्यापीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ

sakal_logo
By

श्रीमती सरितादेवी गतारे
यांची महावीर अध्यासनाला देणगी
कोल्हापूर, ता. १ ः श्रीमती सरितादेवी गतारे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी
एक लाख रुपयांची देणगी दिली. भगवान महावीर अध्यासन इमारत देणगी संकलन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांच्याकडे त्यांनी ती सुपूर्द केली. त्यांनी यापूर्वी दहा हजार रुपयांची देणगी अध्यासनास दिली होती. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, तसेच कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी अजित चौगुले यावेळी उपस्थित होते. अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामासाठीच्या देणगीला आयकरातून शंभर टक्के सूट असून, इच्छुकांनी मदत करावी, असे आवाहन प्रा. डॉ. विजय ककडे यांनी केले आहे.
...........
प्रमोद चौगुले यांचे आज व्याख्यान
कोल्हापूर, ता. १ ः शिवाजी विद्यापीठ आणि बी. बी. पाटील, दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने उद्या (बुधवारी) डॉ. ए. एन. उपाध्ये व्याख्यानमाला होणार आहे. सांगलीचे प्रमोद चौगुले ‘जैन शिल्पकला व स्थापत्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दसरा चौकातील जैन बोर्डिंगमध्ये सकाळी अकरा वाजता व्याख्यान होणार असून, अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख असतील.
..............