सतीश दुध संस्थेतर्फे रिबेट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतीश दुध संस्थेतर्फे रिबेट वाटप
सतीश दुध संस्थेतर्फे रिबेट वाटप

सतीश दुध संस्थेतर्फे रिबेट वाटप

sakal_logo
By

59913
सतीश दूध संस्थेतर्फे रिबेट वाटप
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री सतीश सहकारी दूध उत्पादक व कृषी पूरक सेवा संस्थेकडून संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त उत्पादकांना प्रेशर कुकर व रिबेटचे वाटप केले. म्हैस दुधाला शेकडा २१.८३ तर गाय दुधाला १८.३० रुपयांप्रमाणे १८ लाख ८७ हजार १०८ रुपये रिबेटचे वाटप केले. सभासदांना १५ टक्के लाभांश व नोकरदारांना दोन महिन्याचे वेतन बक्षीस दिले. संस्थाध्यक्ष डॉ. मंगलकुमार पाटील, संचालक सोमान्ना चौगुले, तुकाराम भोसले, माजी सभापती आप्पासाहेब पाटील, सरपंच संदीप पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब बागे, उपसरपंच शिवाजी सावंत, रघुनाथ चौगुले, बाळासाहेब सावंत, शिवाजी चौगुले यांच्याहस्ते सभासदांना भेटवस्तूचे वाटप केले. अधिकाधिक दूध पुरवठा करणाऱ्‍या सुभाष झुरळे, संजय सावंत, भारत बाडकर, भारत बागे, संजय सावंत, प्रसाद भोसले यांचा सत्कार केला. गोकुळचे निवृत्त सहायक व्यवस्थापक महादेव चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
----------------------------------------------------------------

राखीव निधी लाभासाठी आवाहन
गडहिंग्लज : नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग कल्याण कार्यक्रमातंर्गत त्यांच्यासाठी पाच टक्के राखीव निधीचे वाटप केले. त्याच्या लाभासाठी दिव्यांगांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून दिव्यांगाबाबतचे किमान ४० टक्के दिव्यांग प्रमाणपत्रासह स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स अशी कागदपत्रे १५ नोव्हेंबरअखेर पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नसून यापूर्वी लाभधारक व्यक्तींनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
----------------------------------------------------------

59914
गिजवणेत कायदेविषयक शिबिर
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत मोफत विधी सल्ला व सेवा पुरवण्यासाठी गिजवणे येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. पक्षकारांचा आर्थिक भुर्दंड, शारीरिक व मानसिक त्रास वाचविण्यासाठी तसेच वैवाहिक व अन्य प्रकारणात वाद मध्यस्थी व समेट पद्धतीने मिटवून कायद्याबाबत साक्षरता निर्माण करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश अतुल उबाळे, अ‍ॅड. शीतल साळवी, एस. आर. कांबळे, संदीप उंडाळे, सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, भूषण गायकवाड, अमित देसाई, शिल्पा पाटील, अन्नपूर्णा नाईक, शशिकला पोडजाळे, संतोष चव्हाण, तमाण्णा पडदाळे, शीतल पाटील, अलीखान पठाण, महादेव कुंभार, अभिनंदन पाटील, निर्मल पाटील, डॉ. माने, चंद्रकांत लष्करे, उदय कडूकर आदी उपस्थित होते.