गडहिंग्लजच्या किल्ला स्पर्धेत आम्ही मावळे ग्रुप विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजच्या किल्ला स्पर्धेत आम्ही मावळे ग्रुप विजयी
गडहिंग्लजच्या किल्ला स्पर्धेत आम्ही मावळे ग्रुप विजयी

गडहिंग्लजच्या किल्ला स्पर्धेत आम्ही मावळे ग्रुप विजयी

sakal_logo
By

59915
---------------------------------------------------
गडहिंग्लजच्या किल्ला स्पर्धेत
आम्ही मावळे ग्रुप विजयी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : दिवाळीनिमित्त येथील हिरण्यकेशी फौंडेशन व माझं गडहिंग्लजतर्फे आयोजित केलेल्या गडहिंग्लज शहर मर्यादित किल्ले बांधणी स्पर्धेत नदीवेसच्या आम्ही मावळे ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला.
अलीकडील काही वर्षांपासून किल्ले बांधणीत चिमुकल्यांचा सहभाग वाढला आहे. यावर्षी शहर आणि परिसरात उभारलेल्या शंभरभर गडकिल्ल्यांद्वारे शहरात शिवसृष्टी अवतरली होती. चिमुकल्यांनी हुबेहुब उभारलेले गडकिल्ले पाहून नागरिकही आश्‍चर्यचकीत झाले. या उपक्रमामुळे किल्ले संवर्धनाला प्रोत्साहन आणि इतिहासालाही उजाळा मिळाला.
चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक दिला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक लाखेनगरातील समर्थ तरुण मंडळाने, तिसरा क्रमांक आझाद तरुण मंडळाने पटकावला. श्री शिवाजी महाराज बालतरुण मंडळ, हाळलक्ष्मी मंडळ, तर भीमनगरातील बीएएफसी ग्रुपने उत्तेजनार्थचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेसाठी हिरण्यकेशी फौंडेशनचे अध्यक्ष सुनील चौगुले, कावेरी चौगुले, प्रशांत बाटे, आदेश विचारे, सुशील देवार्डे आदींनी परिश्रम घेततले. आदेश विचारे, सुशील देवार्डे व श्रीधर कुंभार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.