योगेंद्र यादव समता यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगेंद्र यादव समता यात्रा
योगेंद्र यादव समता यात्रा

योगेंद्र यादव समता यात्रा

sakal_logo
By

59926

सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम
योगेंद्र यादव; जनसंवाद यात्रेसाठी विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः ‘महात्मा गांधीजींच्या देशाला गोडसेंचा देश बनविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. संविधान नाकारून लोकशाही धोक्यात आणत आहेत. या विरोधात आवाज उठविण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन जनसंवाद यात्रा आम्ही कोल्हापुरातून सुरू करत आहोत. या यात्रेतून जोडली जाणारी जनता देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली उतरवेल,’ असा विश्वास शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी आज येथे व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला, त्याच भूमीतून आम्ही समतेचा संदेश घेऊन जनसंवाद यात्रा बिंदू चौकातून सुरू करीत आहोत. संविधान बचाओ, देश बचाओ, भारत जोडो असा नारा देत कोल्हापूर ते नांदेड या मार्गावरही यात्रा निघणार आहे, असेही यादव यांनी सांगितले. या यात्रेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, जनता दल अशा विविध पक्षांच्या प्रतिनिधींना एकत्र घेऊन शाहू स्मारक भवनात मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यादव म्हणाले, ‘प्राणाची बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे योगदान अनमोल आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जगणे सुसह्य करण्याचा स्वातंत्र्याचा हेतू होता; मात्र सध्या केंद्रातील सत्ताधारी त्या उद्देशाला तिलांजली देत आहेत. त्यांनी संविधानाचे अस्तित्व नावापुरते ठेवले. राम रहीम हा बुवा बलात्काराच्या गुन्‍ह्यात आजन्म शिक्षा लागली असूनही तो तुरुंगातून सुटी घेऊन निवडणूक काळात बाहेर आला. देशात महागाई वाढली. गौतम आदाणींकडे कोरोना काळात ६६ हजार कोटींची संपत्ती होती. कोरोनानंतर १२ लाख कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आली. सामान्य व्यक्तींच्या घरात ६६ हजार रुपये नाहीत. जगणे असह्य झाले. या विरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या मागे इडी लावली जाते. तुरुंगात घालण्याची भाषा होते. सामान्यांना भीती दाखवली जाते. जेव्हा एकटी व्यक्ती घाबरू शकते, त्यावेळी मात्र जनता एकत्र येते तेव्हा भीती पळून जाते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आवाज वाढतो आहे. त्याचे प्रतीक म्हणून या समता यात्रेत समविचारी पक्षांच्या सहभागाने भारत जोडो यात्रा सुरू झाली. तेव्हा आरएसएसने मुस्लीम बांधवांसोबत समझोत्याची बोलणी सुरू केली. महागाई वाढल्याचे कबूल केले आहे हेच या यात्रेचे फलित आहे.’ यावेळी आमदार जयश्री जाधव, भाकपचे दिलीप पोवार, व्यंक्काप्पा भोसले, शिवाजी परूळेकर, शेकापचे बाबूराव कदम आदी उपस्थित होते.