१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

मानसिकतेत बदल हवा
स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून अलीकडे सर्वच शहरांत घंटागाडी उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता की ज्योत जागी रे’ हे गीत कानावर पडले की घंटागाडी आली, असे समीकरण झाले आहे. दुसरीकडे मात्र अनेक मंडळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना दिसतात. सुविधेचा लाभ घेण्याऐवजी असुविधा निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. एखादे अभियान यशस्वी होण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कोपऱ्यात कचरा टाकणाऱ्या मंडळींनी आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची गरज आहे.
नीळकंठ देशिंगकर, मिरज (जि. सांगली)

जगण्यात सकारात्मकता हवी
शहाणपणा सर्वांकडेच नसतो. त्यामुळे अनुभवी लोकांचा चांगला सल्ला घ्यायला हवा. त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणे आवश्‍यक ठरते. कटू शब्द वगळून सौम्य भाषेत बोलायला हवे. ज्ञान व माहिती मिळविण्यासाठी रोज वाचन करावे. अवतीभोवतीच्या लोकांचे निरीक्षण करून त्यांचे चांगले गुण आत्मसात करायला हवेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. प्राणी व पक्ष्यांसाठी खाण्याची सोय करावी. अहंभाव व मीपणा त्यागायला हवा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळून स्वच्छता पाळायला हवी. चांगले पाहावे व शिकत राहावे. वृत्तपत्रांतील बातम्या व लेख रोज वाचायला हवेत. मनात शंका आल्यास वेळीच प्रश्‍न विचारून त्याची शहानिशा करावी. म्हणून चांगली पुस्तके आपणास जगण्याचे बळ देतील. त्यासाठी वाचनाची कास धरायला हवी. असे झाले तर प्रत्येकाच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)