वार्षिक निरंकारी संत समागमची पुर्वतयारी अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक निरंकारी संत समागमची पुर्वतयारी अंतिम टप्प्यात
वार्षिक निरंकारी संत समागमची पुर्वतयारी अंतिम टप्प्यात

वार्षिक निरंकारी संत समागमची पुर्वतयारी अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

59969
सदगुरू माता सुदिक्षाजी

हरियाणा येथे १६ नोव्हेंबरला
वार्षिक निरंकारी संत समागम
कोल्हापूर ः समदृष्टीच्या भावनेचे दर्शन घडविणाऱ्या ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा प्रारंभ १६ नोव्हेंबरला हरियाणातील आध्यात्मिक स्थळ, समालखा मैदान येथे होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून निरंकारी भाविक येथे सेवा देत आहेत. सद्‌गुरू माता सुदिक्षाजी देखील समागम स्थळी उपस्थित आहेत. यंदा भारत तसेच विदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी होतील. समागम स्थळावर भव्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था असेल. तसेच मैदानावर स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था केली असून तिथे सवलतीच्या दरात अल्पोपहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मैदानावर स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाणार असून पार्किंग, सुरक्षाव्यवस्थाही केली आहे. समागमात सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी रेल्वेव्दारे आध्यात्मिक स्थळ समालखा जवळ असणाऱ्या भोडवाल माजरी रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबविण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भाविकांना रेल्वेने समागम स्थळी पोचता येणार आहे, अशी माहिती राजकुमारी यांनी दिली.