राजर्षींच्या विचाराला तिलांजली देण्याचा प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षींच्या विचाराला तिलांजली देण्याचा प्रकार
राजर्षींच्या विचाराला तिलांजली देण्याचा प्रकार

राजर्षींच्या विचाराला तिलांजली देण्याचा प्रकार

sakal_logo
By

60025

यात्री निवासाचा प्रयत्न
केल्यास जनआंदोलन

मेन राजारामप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे संजयसिंह चव्‍हाण यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २ : मेन राजाराम हायस्‍कूल व ज्युनियर कॉलेज म्‍हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. तेथे यात्री निवास काढून कोणी राजर्षींच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्‍न केला तर संभाजी बिग्रेड जनआंदोलन उभे करेल, असा इशारा जिल्‍हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांना दिले.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मेन राजाराम हायस्‍कूलला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या शाळेतून अनेक दिग्‍गजांनी शिक्षण घेतले आहे. कोल्‍हापूरकरांच्या अस्‍मिता शाळेशी जोडल्या आहेत. या शाळेला गतवैभव मिळावे, यासाठी संभाजी ब्रिगेडने शहरात जाणीवजागृती केली. त्यामुळे पटसंख्या वाढण्यास मदत होत आहे. आजही हायस्‍कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे स्‍थलांतर करुन राजकीय नेतेमंडळी यात्री निवास करण्यासाठी चाचपणी करत आहेत, हे योग्य नाही. संबंधितांनी शाळेला भेट देऊन ही शाळा टिकावी, पटसंख्या वाढावी यासाठी काही सूचना दिल्या असत्या तर ते अधिक संयुक्‍तीक ठरले असते. मात्र ही शाळा बंद पाडण्यासाठीच प्रयत्‍न सुरू आहेत. यापूर्वीही कागलकर हाउस येथे असाच प्रयोग केला होता. तो यशस्‍वी न झाल्याने आता मेन राजारामवर लक्ष केंद्रित केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी यात्री निवास करण्यासाठी मेन राजाराम व शेतकरी संघाच्या इमारतीची पाहणी सुरू आहे. या दोन्हीही ऐतिहासिक इमारती आहेत. त्यामुळे कदापिही येथे यात्री निवास होऊ देणार आहे. शासनाने शालिनी पॅलेस हॉटेल विकत घेऊन तेथे यात्रेकरूंची व्यवस्था करावी. जयप्रभा स्‍टुडिओमध्येही यात्री निवास बांधणे शक्य आहे. मात्र मेन राजाराममध्ये शाळा सोडून इतर बाबींना कडाडून विरोध केला जाईल, असे पाटील यांनी कळविले आहे.