आर. आर. अकॅडमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर. आर. अकॅडमी
आर. आर. अकॅडमी

आर. आर. अकॅडमी

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad२६.jpg
५९९६६
गडहिंग्लज : धारवाड आयआयटीत प्रवेश मिळाल्याबद्दल ओंकार कुलकर्णी याच्या सत्कारप्रसंगी सुनील कुलकर्णी, एच. रेड्डी व मंजिरी देशपांडे.
---------------------------------------------------
कठोर मेहनतीने भविष्य घडवा
सुनील कुलकर्णी ; आर. आर. ॲकॅडमीत व्याख्यान

गडहिंग्लज, ता. २ : ध्येय गाठायचे असेल तर अथक परिश्रम केले पाहिजेत. नीट व आयआयटीसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी देशपातळीवर तयारी करतात. या परीक्षांतील यशासाठी कठोर मेहनत करून उज्ज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन सिंगापुरात कार्यरत शास्त्रज्ञ व बेकनाळचे सुपुत्र सुनील कुलकर्णी यांनी केले.
येथे आर. आर. ॲकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आयआयटी व नीट परीक्षेतील यशासाठी ॲकॅडमीतील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने सराव केल्यास यशाचा मार्ग सोपा होतो. आजच्या सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानामुळे गडहिंग्लजसारख्या ठिकाणी राहूनही ध्येय गाठणे सहजशक्य आहे.’ यावेळी कुलकर्णी यांनी बेकनाळ ते सिंगापूर हा प्रवास सांगताना नव्वदीच्या दशकातील व आजच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बेकनाळच्या ओंकार कुलकर्णीला आयआयटी धारवाडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचा अकॅडमी संचालक एच. रेड्डी व समन्वयक सौ. मंजिरी देशपांडे यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी ओंकारने बोर्ड परीक्षेची तयारी, जेईई, सीईटी स्पर्धा परीक्षांच्या तयारीची माहिती दिली. फिजीक्स, केमिस्ट्री, गणित विषयांच्या अभ्यासावेळी सरावावर भर दिला पाहिजे, असेही त्याने सांगितले. श्‍वेता दड्डी यांनी स्वागत केले. एच. रेड्डी यांनी आभार मानले.