आजरा ः संक्षिप्त बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः  संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी

आजरा ः संक्षिप्त बातमी

sakal_logo
By

आमदार आबिटकर यांच्याकडून
मुख्यमंत्र्यांना निवेदन
आजरा, ता. 2 ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन वजा पत्र दिले आहे. जलजीवन मिशन योजनेअतंर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणी शासनामार्फत भरावी, अशी विनंती केली आहे. निवेदनात म्हंटले आहे, 2021-22 मध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा याेजना मंजूर झाल्या होत्या. परंतु योजनेमध्ये अंदाजपत्रकाच्या 10 टक्के लोकसहभाग आहे. तत्कालीन शिवसेना भाजप सरकारने लोकवर्गणीचा हिस्सा शासनामार्फत भरणेचे धोरण निश्चित केले होते. यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीना लोकवर्गणी भरणे अशक्य आहे. जलजीवन मिशन योजनेअतंर्गत ग्रामिण भागातील पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणी शासनामार्फत भरण्याविषय़ी संबधीत विभागाला निर्देश देवून सहकार्य करावे. अशी विनंती केली आहे.