आवश्यक बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक बातम्या
आवश्यक बातम्या

आवश्यक बातम्या

sakal_logo
By

अल्पवयीन मुलींना पळवून
नेणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करा

कोल्हापूर, ता. २ ः जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींना प्रेम प्रकरणामध्ये अडकवून पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. चार महिन्यांपासून ग्रामीण भागातील करवीर तालुक्यातील केर्ली येथील मुलगी बेपत्ता आहे. पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारून वैतागलेल्या आईवडिलांना अद्याप त्या मुलीचा ताबा मिळालेला नाही. पोलिस तिच्या आईवडिलांना पोलिस ठाण्यातून हाकलून लावतात, अशी माहिती आहे. त्याचबरोबर आणखी एक चौदा वर्षांची मुलगी अशाच फसवेगिरीमुळे बेपत्ता आहे. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाईची मागणी मोहोमेडन एज्युकेशन सोसायटी, मुस्लीम बोर्डिंगने केली आहे.
अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या तरुणांवर जुजबी कारवाई न करता पोक्सो कायद्याखाली सर्वांना अटक होणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलींच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत त्याकरता पन्हाळा रोडवर लॉजिंग व इतर ठिकाणी पोलिसांनी कारवाई सुरू केली तर निश्चितपणे यावर आळा बसेल. अशा कुठल्याही अल्पवयीन मुलींच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, प्रशासक रफिक शेख, रफिक मुल्ला, मलिक बागवान, लियाकत मुजावर, जहांगीर आतार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
............
वीरशैव समाजाचा वधू-वर
मेळावा डिसेंबरमध्ये
कोल्हापूर ः वीरशैव लिंगायत समाजाच्या बैठकीत डिसेंबरमध्ये राजव्यापी वधू-वर मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे होते. ४ डिसेंबरला बिंदू चौकाजवळील अक्कमहादेवी मंडपात होणाऱ्या या मेळाव्यात वीरशैव समाजातील सर्व जाती, उपजातीतील विवाहेच्छुक युवक - युवती, घटस्फोटित, विदुरांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येणार असून, पंचम, शीलवंत, जंगम, तेली, कुंभार, माळी, कोष्टी, गवळी, बनीजगेर आदी उपजातीतील वधू-वर इच्छुक या मेळाव्यात सहभागी होतील. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र आदी राज्यांतून वधू-वर सहभागी होणार असल्याचे गाताडे यांनी सांगितले. उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, सचिव राजू वाली, संचालक नानासाहेब नष्टे, राजेश पाटील चंदूरकर, सुहास भेंडे, सतीश खोतलांडे, सुभाष चौगुले, कुमार हिरेमठ, मनोहर गाडवे, किरण सांगावकर, चंद्रकांत हळदे, वसंतराव सांगवडेकर, व्यवस्थापक बी. एस. पाटील आदी उपस्थित होते.