कोल्हापूर विमानतळावर आजपासून ‘नाईट लँडिंग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर विमानतळावर 
आजपासून ‘नाईट लँडिंग’
कोल्हापूर विमानतळावर आजपासून ‘नाईट लँडिंग’

कोल्हापूर विमानतळावर आजपासून ‘नाईट लँडिंग’

sakal_logo
By

60004
कोल्हापूर ः नाईट लँडिंगसाठी सुसज्ज झालेले कोल्हापूरचे विमानतळ.

कोल्हापूर विमानतळावर
आजपासून ‘नाईट लँडिंग’
कोल्हापूर, ता. २ ः गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उद्या (ता. ३)पासून कार्यान्वित होत आहे. प्रशासनाने या सुविधेची तयारी पूर्ण केली. तथापि, उद्या कोणत्याही विमान कंपनीने नाईट लँडिंगसाठी परवानगी मागितलेली नाही.
केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे सप्टेंबरमध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी कोल्हापूर विमानतळावरील विविध सुविधांचा आढावा घेतला होता. त्याचदिवशी त्यांनी ४ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याचदिवशी त्यांनी या विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेलाही उद्यापासून सुरुवात होईल, अशी घोषणा केली होती. त्याची तयारी विमानतळ प्रशासनाकडून सुरू होती.
विमानतळाची पूर्वीची धावपट्टी एक हजार ३७० मीटर होती, ती वाढवून आता एक हजार ९३० मीटर करण्यात आली आहे; पण नाईट लँडिंगची सुविधा जुन्या एक हजार ३७० मीटर धावपट्टीवरच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या सुविधेची पाहणी ‘डीजीसीए’च्या पथकाने यापूर्वीच केली आहे. त्यानंतर या सुविधेला परवानगी मिळाली.
कोल्हापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती जगभरातील विमान कंपन्या व वैमानिकांना व्हावी, यासाठी ही माहिती एरॉनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन या प्रणालीवर प्रसारित करण्यात आली आहे. धावपट्टीवरील मार्किंगचे काम, लाईट व्यवस्थेची पाहणी, विमानांच्या ये-जा करण्याचे मार्ग, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आदी कामे पूर्ण झाली आहेत.

रात्री दिवे राहणार सुरू
ही सुविधा उद्यापासून सुरू होत आहे; पण विमान कंपन्यांनी नाईट लँडिंगची परवागनी मागितली नसली तरी उद्यापासून या सुविधेसाठी लावण्यात आलेले दिवे सुरू राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या विमानाचे लँडिंग करावे लागल्यास अडथळा येऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.