पंढरपूर यात्रेसाठी दोन जादा सोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर यात्रेसाठी 
दोन जादा सोडा
पंढरपूर यात्रेसाठी दोन जादा सोडा

पंढरपूर यात्रेसाठी दोन जादा सोडा

sakal_logo
By

पंढरपूर यात्रेसाठी
दोन जादा सोडा
रेल्वे प्रवासी संघटना मागणी; सह्याद्री एक्‍स्‍प्रेसचाही आग्रह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २ : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात तसेच गेली अनेक महिने बंद असलेली कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी दिली.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोल्हापूर-सोलापूर मार्गावर रेल्वे सेवा सुरू होती. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होत होती. मात्र कोरोनाकाळातही रेल्वे सेवा बंद झाली. ती आज अखेर सुरू झालेली नाही. याच काळात दक्षिण रेल्वे विभागाने कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर या मार्गावर दोन महिन्यांपूर्वी नवीन रेल्वे सेवा सुरू केली आहे. याशिवाय दर शुक्रवारी व सोमवारी कोल्हापूर ते नागपूर या रेल्वे धावतात. या रेल्वेतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होते. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. अनेक जनरेल्वे मिळत नाही म्हणून खासगी गाड्या करून पंढरपूरला जातात काही वेळा एका गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून धोकादायक स्थितीत प्रवास केला जातो. यातून दुर्घटनेचा संभव वाढतो. या बाबी विचारात घेता मध्य रेल्वेने पंढरपूर यात्रेसाठी दोन जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
------------
चौकट
विद्युत रेल्वे सेवा तातडीने सुरू करा
दरम्यान, कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्‍स्‍प्रेस कोरोना काळात बंद झाली. सध्या महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेस एवढीच गाडी मुंबईला जाते यामार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सह्याद्री एक्‍स्‍प्रेस गाडी सुरू करावी. सध्‍या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे कामही साताऱ्यापर्यंत झालेले आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे विद्युत रेल्वे सेवा सुरू झाल्यास कोल्हापूर-सातारापर्यंतचा प्रवास कमी वेळेत करता येणे शक्य होईल. त्यामुळे विद्युत रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी बियानी केली आहे.