केपी-एवाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केपी-एवाय
केपी-एवाय

केपी-एवाय

sakal_logo
By

60026
ए. वाय. यांनी जोडले के.पीं.ना हात
बोरवडेतील प्रकार ः दोघांना एकत्र आणणार - मुश्रीफ

कोल्हापूर, ता. २ ः एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अलीकडच्या काळात पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांना हात जोडत नमस्कार केला. बोरवडे (ता. कागल) येथे लोकांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून बोरवडे येथे झालेल्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन आज श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असलेल्या ए. वाय. - के. पी. या मेहुण्या-पाहुण्यांना निमंत्रित केले होते. रात्री कार्यक्रमाला सुरवात झाल्यानंतर ए. वाय. जरा उशिराच आले. त्या वेळी व्यासपीठाच्या एका कोपऱ्यात के. पी. बसले होते, त्यांच्याकडे बघत ए. वाय. यांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.
के. पी. व ए. वाय. हे एकत्रच राहतील, अशी ग्वाही श्री. मुश्रीफ यांनी दिली. आम्ही बसून जो निर्णय घेऊ तो दोघांनाही मान्य असेल. काही मत-मतांतर, गैरसमज असतात, ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू. परवाच के. पी. व ए. वाय. यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. आता गोड बातमीची वाट पाहा, असेही मुश्रीफ म्हणाले.