चौघांवर विनयभंगाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौघांवर विनयभंगाचा गुन्हा
चौघांवर विनयभंगाचा गुन्हा

चौघांवर विनयभंगाचा गुन्हा

sakal_logo
By

महिलेच्‍या विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा
कोल्हापूर : महिलेला घरात घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेचा विनंयभंग करण्याचा प्रकार शहरात एके ठिकाणी घडला. या प्रकरणी संजय डफळे, आकाश खाडे, सूरज खाडे, अभिषेक चव्हाण (सर्व रा. साळोखे गल्ली, कळंबा) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या जबाबातील माहितीनुसार, या महिलेचे लग्न झाले असून, ती पती, मुले आणि सासू, सासरे यांच्यासोबत राहते. तिच्या वडिलांचे घर असून, त्यांनी ते तिघांच्या नावावर केले आहे. ही महिला आज त्यांच्या घरी गेली असता तिला आत येण्यासाठी चौघांनी विरोध केला. या वेळी झालेल्या वादात विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.