विद्यापीठ निवडणुकीत विकास आघाडी जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ निवडणुकीत विकास आघाडी जोमात
विद्यापीठ निवडणुकीत विकास आघाडी जोमात

विद्यापीठ निवडणुकीत विकास आघाडी जोमात

sakal_logo
By

लोगो- विद्यापीठ

विकास आघाडीचा अधिसभा,
अभ्यासमंडळात वर्चस्वाचा दावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा आणि विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व मिळवले आहे. आघाडीचे अधिसभेत १६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर अभ्यास मंडळात ३९ उमेदवारांना बिनविरोध विजय मिळाला आहे, असा दावा आघाडीचे प्रमुख संजय डी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यांनी आघाडीच्या सर्व सदस्यांसमवेत हॉटेल सयाजी येथे प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
संजय पाटील म्हणाले, ‘विद्यापीठ विकास आघाडी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोठा विजय मिळवेल. त्याची सुरुवात आतापासूनच झाली आहे. संस्थाचालक गटात ५, विद्यापरिषदेत २, प्राचार्यांमध्ये ८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. २८ पैकी १८ अभ्यास मंडळातील ३९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नोंदणीकृत पदवीधर गटातील १० जागांवरही आमचे वर्चस्व राहील. पदवीधर, शिक्षक गटात आम्ही ताकदीने लढणार आहोत. इंजिनिअरिंग, फार्मसी, शिक्षणशास्त्र अभ्यासमंडळावर आघाडीचे वर्चस्व आहे. उर्वरित काही मंडळांवर पूर्ण बहुमत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा आघाडीच्या जागा वाढल्या आहेत.’
आमदार जयंत आसगावकर, सचिव डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. क्रांतिकुमार पाटील, अमित कुलकर्णी, धैर्यशील पाटील, व्ही. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थाचालक, प्राचार्य गटातील बिनविरोध उमेदवार
संस्थाचालक गट - पृथ्वीराज संजय पाटील, ॲड. वैभव पाटील, अमित कुलकर्णी, संजय सावंत, तेजस्विनी मुडेकर, एस. आर. पाटील, अरुण पाटील, अरुण शेजवळ, एस. बी. केंगार, बापूसाहेब सावंत, प्रकाश बापू पाटील, डॉ. मंजिरी मोरे- देसाई, प्राचार्य गट- डॉ. बी. एम. पाटील.