अपहरण झालेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण झालेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात.
अपहरण झालेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

अपहरण झालेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

sakal_logo
By

अपहृत मुलगी संकेश्वरमध्ये सापडली
संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः अपहरण झालेल्या शहरातील अल्पवयीन मुलगी आज संकेश्वरनजीक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना सापडली. त्याचबरोबर अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज मध्यरात्रीनंतर या दोघांनाही शहरात आणले जाणार आहे.
शहरातील एक अल्पवयीन मुलगी १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. एका तरुणाने तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती. १५ दिवस होऊन गेले तरीही तिचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सुरुवातीला त्या तरुणाचे मोबाईल लोकेशन तपासले. सुरुवातीला ते गोव्यात असल्याचे लोकेशनवरून कळत होते. मात्र, नंतर त्यांचे लोकेशन कळेनासे झाले. दरम्यान, शहरातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून याबाबत पोस्ट करण्यास सुरुवात केली. आज सकाळी आमदार नितेश राणे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांची तपास पथके बेळगाव, संकेश्वर या ठिकाणी तपास करत होती. दरम्यान, आज संध्याकाळी मुलगा आणि मुलगी संकेश्वर येथे सापडले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी साळेखे हे होते. तपास पथक दोघांना घेऊन रात्री उशिरा कोल्हापुरात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.