आव्हान स्वीकाराल तरच जीवन बदलेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आव्हान स्वीकाराल तरच जीवन बदलेल
आव्हान स्वीकाराल तरच जीवन बदलेल

आव्हान स्वीकाराल तरच जीवन बदलेल

sakal_logo
By

60037
-------------------------------
आव्हान स्वीकाराल तरच जीवन बदलेल
बाबासाहेब वाघमोडे; नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : ज्ञानाची अखंड साधना, आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी अंगी निर्माण केली पाहिजे. आयुष्यामध्ये निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करता आली पाहिजे. आव्हान स्वीकाराल तेव्हाच तुमच्या जीवनात बदल होईल, असा सल्ला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिला.
येथील हडपद आप्पण्णा लिंगायत नाभिक समाजातर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दहावी, बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या वेळी वधू-वर सूचक मेळावाही झाला.
श्री. वाघमोडे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील मुलांकडे प्रचंड ऊर्जा असते. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. बदलत्या काळात ज्येष्ठांचा सन्मान होताना दिसत नाही. आपण कितीही मोठे झालो तरीही आई-वडील व ज्येष्ठ मंडळींचा मान-सन्मान राखला पाहिजे. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.’’
मंडळाचे अध्यक्ष अजित कोरे व उपाध्यक्ष कृष्णा कोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. श्री. वाघमोडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. बसव दलाचे महादेव मुसळे, मारुती हळीज्वाळे, युवराज कोरे, महादेव चिंचले, सिद्धू तडस, शिवानंद कोरे, विशाल चिंचले, मल्लिकार्जुन कोरे आदी उपस्थित होते. प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. उदय हळीज्वाळे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत कोरे यांनी आभार मानले.